आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करताय, Facial Identity चोरीला जाण्याची शक्यता

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा ट्रेंड सुरु असून सर्वच वयोगटातील अनेकांना ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा मोह आवरता येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान घिबली किंवा इतर कोणतीही AI इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो त्या एआय प्रणालीसोबत शेअर करावा लागतो. त्यानंतर घिबली इमेज तयार होऊन मिळते मात्र या प्रक्रियेत तुमची चेहऱ्याची ओळख Facial Identity चोरीला जाण्याची शक्यता असून भविष्यात याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो या बाबतीत सविस्तर जाणून घेऊया.

सध्या चॅटजीपीटी ४.० (ChatGPT 4.0) आणि इतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ (‘Ghibli’) स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. फोटो वापरून या आकर्षक इमेजेस तयार करत आहेत आणि फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram), एक्स (X) वेगवेगळ्या साईड वर शेअर करतांना दिसून येत आहेत. पण यामुळे तुमची ओळख नकळत धोक्यात येउ शकते. याची तुम्ही गाभिर्य लक्ष्यात घेतले पाहिजे.
Leave a Reply