
जळगाव (11 नोव्हेंबर 2024) : शहरातील लहान विक्रेते आणि रस्त्यावरील छोटे व्यावसायीक जयश्री महाजन यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी सोमवार, 11 रोजी हरेश्वर नगरातून आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात केली. या रॅलीमध्ये महाविकास आघाडीच्या असंख्य नेत्यांसह कार्यकर्ते, समर्थक, आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या भागात प्रचार रॅली
सकाळी 8 ते 12 दरम्यान प्रभाग क्रमांक 9 मध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी काढलेल्या प्रचार फेरीचा व्हिडीओ बातमीसाठी. या प्रचार फेरीचा शुभारंभ हरीहरेश्वर मंदीर द्रौपदी नगर येथे झाला. त्यानंतर शर्मा सांडू कंपनी, प्रितम स्वेअर्स, देवकीनंद हॉल, दिलासा व्यसनमुक्ती केंद्र, बेंडाळे स्टॉप, कृष्णा टॉवर, केरळी मंदीर, स्वामी समर्थ मंदीर, तेली वाडा, शिवरत्न चौक, निवृत्तीनगर, एस.एम.आय.टी. रोड, गुजर गल्ली, बालविश्व स्कूल, श्री रेसिडेन्सी, साई होमिओपॅथी या मार्गे म्युनिसिपल इंजिनिअर भागवत पाटील यांच्या घरासमोर प्रचार फेरीचा समारोप करण्यात आला.
Leave a Reply