जळगाव : आरोग्य विभागातील लाचखोर अधिकारी एसीबीच्या ताब्यात, तर मोठ्य- मोठ्या अधिकाऱ्याची चौकशी सुरु

हॅलो महाराष्ट्र न्युजवाले , जळगाव :

जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तक्रारदाराने लाच मागितल्याबाबत तक्रार दिली होती. आरोग्य अधिकाऱ्याने त्याचे शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. जळगाव एसीबीने लाच मागणीची सत्यता पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी आरोग्य विभागात सापळा लावला. त्यात एका अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदाच्या व्यक्तीला तडजोडीअंती १५ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती मिळाली आहे.

जळगाव येथील जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात आज दुपारी तक्रारदारकडून लाचखोरीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीवरून सापळा लावला. एका आरोग्य अधिकाऱ्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. तर इतरांची मोठ्या अधिकाऱ्याची कडून चौकशी सुरु असून संबंधित अधिकारी हा एसीबी च्या कार्यालयात चौकशी साठी येऊन बसल्याचे देखील समोर आले आहे.

प्रकरण दडपण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांवर दबाव असल्याची सूत्रांची माहिती…

या प्रकरणात इतर मोठ्य मोठ्या अधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून इतर आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी सुरु आहे. जळगाव एसीबीचे पथक त्यांना कार्यालयात बोलवून माहिती घेत आहे. तर एसीबीच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पुढील कारवाई करीत असले तरी ह्या प्रकरणातील इतर अधिकाऱ्यांची नावे समोर येऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी दबाव असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे या इतर अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *