मुंबई / जळगाव : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात गुटखा, पानमसाला व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून गरज पडल्यास मोक्का (MCOCA) अंतर्गतही गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा स्पष्ट इशारा :
मंत्री झिरवाळ म्हणाले, “गुटखा विक्रीमुळे तरुणांचे आरोग्य धोक्यात येत आहे. वारंवार कारवाई होऊनही काही विक्रेते पुन्हा गुटखा विक्री करत आहेत. अशा गुन्हेगारांवर केवळ दंड नव्हे, तर मोक्कासारखी कठोर कारवाई केली जाईल.”
काय असणार कारवाई?
गुटखा विक्री करणारे सवयीचे गुन्हेगार आढळल्यास मोक्काअंतर्गत प्रस्ताव अन्न व औषध प्रशासन, पोलीस व स्थानिक प्रशासनाची संयुक्त मोहीम साठा जप्ती, दुकाने सील करणे व गुन्हे दाखल वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांवरही कडक कारवाई
प्रशासन अलर्ट मोडवर :
नूतन वर्षात राज्यभरात विशेष पथके तयार करून अचानक तपासण्या केल्या जाणार आहेत. शाळा, महाविद्यालये, बसस्थानके व बाजारपेठांवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांना आवाहन :
मंत्री झिरवाळ यांनी नागरिकांना आवाहन केले की, “कोणत्याही ठिकाणी गुटखा विक्री होत असल्यास त्वरित प्रशासनाला माहिती द्या. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.”
⚠️ नूतन वर्षात गुटखा विक्रेत्यांसाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जाणार असल्याने राज्यातील कारवाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply