रामनवमीच्या प्रसंगी अयोध्येत राम भक्तांचा मोठा उत्साह : रामलल्लाचा सूर्य टिळा !! - नवी दिल्ली : देशभरात आज रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून देशभरातील राम मंदिरांमध्ये रामभक्तांचा सागर लोटला आहे. ठिकाठिकाणी राम नवमीचे विविध कार्यक्रम होत आहे. परंतु अयोध्येत राम मंदिरात देशभरातील भाविक आले आहेत. रामलल्लाचे दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांची पारणे रामनवमीच्या दिवशी रविवारी फिटली. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा टीळा सूर्यकिरणांनी लावण्यात आला. […]