मंत्री गिरीश महाजन यांचाखडसेवर हल्लाबोल : तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील !

जळगाव :  राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. खडसे यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना आता गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आपल्यावर झालेल्या आरोपांवर एक पुरावा दाखवला तरी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन, असे म्हणत महाजन यांनी खडसेंच्या आरोपांना उत्तर दिले आहे. तसेच, मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील. एक नंबरचे महाचोर आहेत, अशा शब्दात त्यांच्यावर निशाणा महाजनांनी खडसेंवर देखील साधला आहे .

एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा आधार घेत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले होते. “गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी क्लिप प्रकाशित केली आहे. त्यामध्ये म्हटले की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगल्या रात्री अशा’. गिरीश महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहे. त्या महिलेचे नाव देखील मला माहित आहे मात्र ते नाव सांगणे उचित होणार नाही. पण ज्यावेळेस मंत्रिमंडळाचा विस्तारासाठी अमित शहांकडे बैठक झाली. त्यावेळी अमित शहांनी मंत्री गिरीश महाजन यांना बोलवून घेतले होते.”, असे खडसे म्हणाले होते. त्यांच्या या आरोपाला आता महाजनांनी जोरदार प्रत्युत्त दिले.

खडसेंचे आरोप फेटाळत महाजन म्हणाले की, मी जर त्यांच्याबद्दल तोंड उघडलं तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील. एक नंबरचे महाचोर आहेत. कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरं काही जमत नाही. आपल्यावर झालेल्या आरोपांवर एक तरी पुरावा दाखवावा, सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळ करतील. घरातलीच गोष्ट आहे पण मी बोलणार नाही, मला बोलायला लावू नका, असा इशाराच त्यांनी दिला.

तसेच, विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडे बोलायचं. स्वतः नंबर एकच  महाचोर आहेत. त्यांचे सगळे धंदे लोकांना माहित आहेत. मी जर त्यांच्याबद्दल एका गोष्टीची वाच्यता केली तर लोक त्यांना बाहेर आल्यावर जोड्याने मारतील, अशी बोचरी टीका देखील महाजनांनी केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *