
मुंबई : – अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात कुणाचे सरकार येणार यावरून अनेक एक्झीट पोल समोर आले. त्यात तीन एक्झिट पोलनी मविआला सत्तेत बसताना दाखविले तर अन्य काहींनी महायुतीच सत्तेत येणार असल्याचा दावा केला तर एका पोलने दोघांपैकी कोणालाच बहुमत दिलेले नाही. आता एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आला असून त्यात महायुतीच पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते, असा कौल देण्यात आला आहे.
असे आहे अंदाज
एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला 178 ते 200 जागा मिळू शकतील. तर महाविकास आघाडीला 82 ते 102 जागा मिळतील. तर अन्य आणि अपक्षांना 06 ते 12 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भाजपा ठरणार सर्वांत मोठा पक्ष, 107 जागांचा अंदाज
एक्सीस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला 98 ते 107 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला तर शिवसेना शिंदे गटाला 53 ते 58 जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 25 ते 30 जागा आणि महायुतीतील अन्य घटक पक्षांना 2 ते 5 जागा मिळतील, असा अंदाज यात देण्यात आला आहे. महाविकास आघाडीचा विचार केल्यास काँग्रेस मोठा पक्ष ठरेल.काँग्रेसला 28 ते 36 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 26 ते 32 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 26 ते 30 जागा आणि मविआतील अन्य पक्षांना 2 ते 4 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महायुतीला 48 टक्के, महाविकास आघाडीला 37 टक्के मते महायुतीला एकूण 48 टक्के मते मिळतील.
यामध्ये महायुतीला 48 टक्के, महाविकास आघाडीला 37 टक्के मतेमहायुतीला एकूण 48 टक्के मते मिळतील. यामध्ये भाजपाला 27 टक्के, शिवसेना शिंदे गटाला 13 टक्के, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 7 टक्के आणि महायुतीतील अन्य पक्षांचे व्होट शेअरिंग एक टक्का असेल, असा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला एकूण 37 टक्के मते मिळतील. यामध्ये काँग्रेसला 13 टक्के, ठाकरे गट 12 टक्के, शरद पवार गटाला 11टक्के आणि मविवातील अन्य पक्षांना 2 टक्का मते मिळतील, असा अंदाज आहे.
वंचित आघाडीला भुसावळ ची जागा मिळण्याची शक्यता
राज्यात वंचित बहुजन आघाडीला भुसावल विधानसभा जागा मिळण्याची शक्यता आहे कारण की तिथं तिरंगी लढत असल्याने सदर जागा मिळणार वंचितच्या कोट्यात जाईल असा अंदाज देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीला 3 टक्के मते मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अन्य अपक्षांना 6 ते 12 जागा मिळू शकतात, वंचित बहुजन चा हा अंदाज महाराष्ट्र न्यूज वाले चैनल कडून वर्तविण्यात आला आहे
Leave a Reply