
मेहकर – मेकर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात विजयी झाल्याचा निकाल 23 रोजी लागला व त्यानंतर 24 नोव्हेंबरच्या रात्री हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर शहरात दंगल उसळली. दोन गटातील लोकांनी एकमेकांवर तुफान दगडफेक करीत पाच वाहनांची तोडफोड, जाळपोळ केली. ही घटना रविवारी 24 नोव्हेंबरला रात्री 10.30 वाजताच्या सुमारास माळीपेठ, मरीमाता चौक परिसरात घडली.

या संशयित लोकांवर गुन्हे दाखल झाले
पोलिसांनी शेख साजिद शेख करामत, शेख करामत शेख सत्तार, शेख अमीर शेख अब्दुल हमीद, शेख अर्मान शेख मन्सूर, शेख यामीन शेख अब्दुल हमीद, साहिल शाह अनिशा व इतर 30 ते 40 जणांविरुद्ध कलम 189(2)19(2)(3) 190, 115 (2) 324,326 कलमान्वये गुन्हा दाखल केला. यासोबतच शेख साजिद शेख करामत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश राऊत, ओम सौभागे, सुनील तिघाडे व इतर 12 जणांनी बेकायदा मंडळी जमवून तलवारीने वार केला. लाठी-काठीने मारहाण केली. पोलिसांनी या आरोपीविरुद्ध ही विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 20 व्यक्तींच्या आसपास दंगेखोरांना अटक केली.
20 दंगलखोरांना आसपास अटक
तणाव निर्माण झाल्याने शहरात रविवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली. या घटनेत पोलिसांनी 20 दंगलखोरांना एकमेकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून अटक करण्यात आली तर 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आल्याने सध्याचे वातावरण पोलिसांनी शिथिल केले आहे . तसेच या दंगलीत कार क्र .MH30ML0408 व दोन मोटारसायकल, ऑटोरिक्षा आदींना आग लावून पेटवून देण्यात आले. तुषार साळवे (40) रा. माळीपेठ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काही लोकांनी जमाव जमवून वाहनावर पेट्रोल ओतून पेटवून दिले व जीवे मारण्याच्या उद्देशाने घरातील लोकांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
Leave a Reply