जळगाव :- गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून असलेल्या पालकमंत्री पदाची यादी आज जाहीर झाली असून जळगावचा धुरा हि पुन्हा ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि यानंतर मंत्रीपदांचा शपथविधी होऊन देकील अद्याप पालकमंत्री पदांची यादी जाहीर झालेली नव्हती. यातच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.गेल्या अनेक वर्षापासून पालकमंत्री पदाचा धुरा हि गुलाबराव पाटील यांच्याकडे असली तरी आता भाजपा तर्फे याचा दावा करण्यात आलेला होता. यामुळे पालकमंत्री पद नेमके कोणाला मिळणार याबाबत मोठीच उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने पालकमंत्र्याची यादी जाहीर केली आहे.

या यादीनुसार जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.यामुळे आता पाच वर्षापेक्षा पुढील कालावधीत देखील्गुलाब्राव पाटील यांच्याकडेच जळगाव जिल्ह्याचा धुरा असेल हे आता स्पष्ट झालेला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील मातब्बर नेते तथा भाजपाचे जेष्ठ मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याची महत्वाची दूर सोपवण्यात आलेली आहे. तर ना.संजय सावकारे यांच्याकडे भंडारा जिल्ह्याची दूर सोपवण्यात आली आहे.
ना. गुलाबराव पाटील यांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये पालकमंत्री पद भूषवले होते. आता या मंत्रिमंडळात त्यांना आधीचेच पाणी पुरवठा व स्वच्छ्ता हे खाते मिळाले असून सोबत जळगाव चे पालकमंत्री पद मिळायची बाब लक्षणीय मानली जात आहे.
Leave a Reply