जळगावात 108 नंबरच्या आपत्कालीन रुग्णवाहिकेचा भीषण स्फोट अंगावर काटा आणणारा थरार व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे व्हायरल

महाराष्ट्र न्यूज वाले – शहर – जळगाव प्राप्त माहितीनुसार सांगायचे म्हटले तर सविस्तर असे की एरंडोल येथील शासकीय रुग्णालयातून एका बाळंतीण महिलेला तिच्या बाळासह जिल्हा शासकीय रुग्णालयात असताना रुग्णवाहिकेचा जळगाव शहरातील खोटे नगर जवळील गुजराल पेट्रोल पंपाजवळ अरुंद पुलावर भीषण स्फोट झाल्याने जळगाव हादरले आहे. दरम्यान, चालकाने प्रसंगावधान राखत स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतील गरोदर स्त्री आणि तिच्या कुटुंबियांना सुखरुप बाहेर काढत सुरक्षित स्थळी हलविल्याने ते थोडक्यात बचावले. अंगावर थरार आणणाऱ्या या स्फोटाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.याबाबत असे की, एरंडोल येथील शासकीय रुग्णालयातून एका बाळंतीण महिलेला तिच्या बाळासह जिल्हा शासकीय रुग्णालयात आणताना रुग्णवाहिकेत स्पार्किंग होऊन ती पेटली आणि त्यातील एका ऑक्सिजन सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. बुधवारी रात्री ९.३० वाजता दादावाडीजवळील उड्डाणपुलावर ही घटना घडली.रुग्णवाहिका (क्र. एमएच १४ सीएल ७९१) चालक राहुल पाटील याला वेळीच हा धोका लक्षात आल्याने त्याने या महिलेसह तिचे बाळ, दोन नातलग आणि डॉक्टरांना खाली उतरवले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. चालकाच्या या दक्षतेचे कौतुक करण्यात येते आहे. आठच दिवसांपूर्वी म्हणजे ५ नोव्हेंबरला भुसावळ रोडवर कारमध्ये गॅस भरताना झालेल्या भीषण स्फोटाने शहर हादरले होते. त्यानंतर बुधवारी ही दुसरी भीषण घटना घडली आहे.हा स्फोट इतका भीषण होता की, परिसरातील घरांना हादरा बसला तसेच काही लोकांच्या घराच्या खिडक्यांचे काच देखील फुटले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, .या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *