
जळगाव जिल्हा – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका हा नावाजलेला आहे याठिकाणी सध्या तरी दिपनगर भुसावल एमआयडीसी सोडून कसल्याही प्रकारे रोजगार निर्मिती नाही. तरीही मोठ्या प्रमाणावर बाजापेठ, बँकिंग सेक्टर, पतसंस्था, फायनान्स सेक्टर व बियर बार तसेच लॉटरी सेंटर यांची संख्या आहे. परंतु रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्याने काही ना काही अंतर जनतेला दैनंदिन गाठावे लागते. असे असतांना सुद्धा तालुक्याचे शेजारी फेकरी झे.टी.एस रोड वरील दिपनगर येथे सरगम गेट जवळील बाजार पट्ट्या जवळ तसेच तालुक्यातील छोट्या मोठ्या गावांमध्ये सट्टा (मटका) हा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु आहे.परंतु यावर कारवाही फार कमी प्रमाणात होत असते. याचे कारण म्हणजे हे व्यवसाय मोठ – मोठ्या नेत्यांच्या आशिर्वादाने सुरू असल्याची नेहमी ठिक – ठिकाणी चर्चा असते यापासून मिळणारा नफा हा कोट्यवधी च्या घरात असतांना पोलीस प्रशासन या व्यवसायावर आढा घालण्यासाठी कसलेही निर्बंध लावीत नाही असे का ? असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगार युवक वर्गात पसरलेला आहे. या व्यवसायामुळे अनेक घरे परिवार उध्वस्त झाले आहेत याची पोलीस प्रशासनाला खात्री असूनही मोठ्या प्रमाणावर या अवैध सट्टा व्यवसायास चालना का देत आहेत याची सध्या मोठ्या प्रमाणावर तालुक्यात चर्चा रंगली असून यावर कठोर असे निर्बंध लावून नायक चित्रपट तसेच सिंघम चित्रपटातील समाज प्रबोधनात्मक तसेच भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या कलाकृतीचे अनुकरण करून दाखविणारा कलावंत कलाकार याची भूमिका साकार करणाऱ्या निर्भीड कलाकाराची गरज आज भुसावळ तालुक्याला भासत आहे

जनतेची आर्थिक लूट…
कमी वेळात पैसे कमावण्याचे आमिश दाखवून सट्टा चालक लोकांना गंडवत असतात. लोभा मुळे अनेक जन आपली मिळकती सह मालमत्ता विकून सदर जुगार ते खेळत असल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहे.प्रशासनाने लक्ष देण्याची गरज…
भुसावळ तालुका मध्ये सट्टा
भुसावळ तालुका मध्ये मटका खेळणारे व खेळवणारे यांची संख्या वाढत असल्याने ही बाब गंभीर असल्याने प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. सट्टा मटका चालक हे प्रशासनाला घाबरत नसल्याचे दिसून येत आहे. कारण सट्टा हा सर्रास पणे तालुक्यातील ग्रामीण, शहरी भागात सार्वजनिक ठीक ठिकाणी खेळवला जात आहे.
सार्वजनिक ठीक ठीक ठिकाणे झाली सट्टा बाजार…
वरणगाव भुसावळ जुना रोड फेकरी बाजार जवळील भाग , सरगम दिपनगर बाजार पट्ट्या जवळील तसेच तालुक्यातील इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात सट्टा मटका, लाल काला, तितली खबुतर सारखे अवैध धंदे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी गेल्यावर जणू यांचा एक वेगळा बाजारच सुरू झालाय असे भासू लागते.वरील सर्व गोष्टींचा भुसावळ तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनमानावर भयानक परिणाम होताना दिसत आहे. अवैध धंदे सार्वजनिक ठिकाणी पडद्या आड सुरू असल्याने गुन्हेगारांचे येणे जाणे होत असल्याने सर्व सामान्य नागरिकांना भीतीच्या सावटाखाली वावर करावा लागत आहे. तसेच या अवैध धंद्यांना बळी पडलेल्या व्यक्तींचे कुटुंब अर्थात सरकारने आपल्या गरीब लाडक्या बहिणीच्या उद्ध्वस्त होत असलेल्या कुटुंबाला वाचविण्यासाठी ठोस अशी कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.
Leave a Reply