महायुती सरकारमध्ये बीड जिल्ह्याला, मुंडे कुटुबीयांना दोन मंत्रिपदे मिळाले असून येथील सरपंच हत्या प्रकाराणा वरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे.
मुंबई : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधारांना, हत्या प्रकरणातील मास्टरमाईडला अटक करण्याची मागणी जोर धरत आहे. एकीकडे बीडमधील जनता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असतांना दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यांनी आज बीडचे नावे एसपी नवनीत कॉवत यांची भेट घेऊन तपासा संदर्भात आढावा घेतला. त्यातच, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर देत असून नाना पटोले यांनीही मुंडेचा राजीनामा घ्यावा, असी म्हटले आहे. तर, जितेंद्र आव्हाड यांनी मराठा नेत्यांना, मंत्र्यांना उद्देशून लक्ष्य केल. महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी सर्वात पहिली मी केली आहे. कोणती चौकशी केली त्याला काही अर्थ नाही. सर्व गोष्टी त्यांना अवगत होतील आणि ताकदी निशी बाहेर पडतील. त्यामुळे देशमुख यांना न्याय द्यायचा आहे. मला आश्चर्य वाटते कि, मंत्रिमंडळात एवढे मराठा मंत्री आहेत. एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही कि, धनंजय मुंडे यांचे राजीनामा घ्या असे म्हणत राज्य सरकारमधील मराठा मंत्र्यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष्य केल. समाजापेक्षा मंत्रिपद महत्वाचे आहे का? असा सावळी आव्हाड यांनी विचारला आहे.
महायुती सरकारमध्ये बीड जिल्ह्याला, मुंडे कुटुंबियांना दोन मंत्रिपदे मिळाले असून येथील सरपंच हत्या प्रकरणावरून आता वातावरण चांगलच तापलं आहे. त्यामुळे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धार आहे. त्यातच, जितेंद्र आव्हाड यांनीही मंत्रिमंडळातील मराठा नेत्यांना उद्देशून भाष्य केल. मंत्रिमंडळात एवढे मराठा मंत्री आहेत.एकही मराठा मंत्री उठून बोलला नाही कि,धनंजय मुंडे यांचे राजीनामा घ्या असे म्हणत राज्य सरकार मराठा मंत्र्यांना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष्य केल. तर, दुसरीकडे आमदार नरेंद्र पाटील यांनी ही मुंडेच्या राजीनाम्याची अप्रत्यक्षपणे मागणी केली आहे.
वाल्मिक कराड असून 302 चा आरोपी नाही
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोणाला मिळेल यावर बोलतांना, आम्हाला काय करायचे पालकमंत्री पदाबाबत असेही आव्हाड यांनी म्हणाले. तसेच, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोंघांचे आतुमधून किती गुपित आहे, हेच मला सरकारला दाखवायचा आहे, असेही आव्हाड यांनी म्हटले. मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असतांना वाल्मिक कराड पकडला जाईल, अशी अपेक्षा करतात तुम्ही. पण वाल्मिक कराड ला अजून 302 चा आरोपी केला नाही. अधिवेशन संपायची वाट पाहत होते, खूप काही गोष्टी समोर येतील. पण खुनामध्ये त्यांची भागीदारी आहे, व्यवसाय राहू द्या बाजूला, असे हि आव्हाड यांनी म्हटले.
त्यांना मंत्रीपद, पालकमंत्रिपद नको
बीड जिल्ह्याचे पालक मंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं. नागपूर अधिवेशनामध्ये हि चर्चा झाली. ते कृतीमध्ये दिसत नाही. सरपंच म्हणून देशमुख यांनी खूप चांगली भूमिका बजावली आहे. बीड मध्ये जेवढी अनधिकृत काम चालू आहेत, ते नक्की कोणाचे व्यवसाय आहेत हे एकदा बघितलं पाहिजे. येथे दोन नंबरचे व्यवसाय कोण करत, डीजीडीसी बैठकीमध्ये कोणाला काम द्यायला पाहिजे हे गुंड ठरवतात, असे म्हणत नरेंद्र पाटील यांनी अप्रत्यक्षपणे निषाणा साधला. तसेच, आम्हाला वाटत कि ह्यांना मंत्रिपद आणि पालकमंत्री पद मिळायला नाही पाहिजे, हे मुख्यमंत्र्यांनी कृतीमध्ये आणायला पाहिजे, असेही नरेद्र पाटील म्हणाले.
Leave a Reply