उत्तर महाराष्ट्रातील दणदणीत विजयाचे ना.गिरीश महाजन यांना मिळाले ‘गिफ्ट’ !

जामनेर, राजकीय

जळगाव :- जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे नाशिक सारख्या महत्वाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन त्यांना पक्षाचे उत्तर महाराष्ट्रात संपादन केलेल्या विजयाचे गिफ्ट दिल्याचे मानले जात आहे.

      आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळातील पालकमंत्री पदांचे वाटप जाहीर करण्यात आले . यात राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यामध्ये महायुतीतील महत्वाच्या नेत्यांना पालकमंत्री पदमिळाले. यात नाशिकची धुरा हि राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे आलेली आहे. त्यांनी आधी देखील नाशिकचे पालकमंत्री पद हे अतिशय सक्षमपणे सांभाळले होते. त्यांनी भाजपला स्थानिक पातळीवर अतिशय उत्तम असे यश मिळवून दिले आहे. तर अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या यशात देखील त्यांचा अतिशय महत्वाचा वाट आहे.

दरम्यान, यंदा जळगाव जिल्ह्यात देखील पालकमंत्री पदाबाबत चुरस निर्माण झाली होती. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश मिळवून देण्यासाठी गिरीशभाऊ अथवा न. संजय सावकारे यांना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळावे अशी मागणी भाजपकडून करण्यात येत होती. तथापि, पक्षाने जळगावच्या ऐवजी गिरीशभाऊ यांना नाशिकची मोठी जबाबदारी देऊन त्यांच्या कार्याचे यथायोग्य मूल्यमापन केले आहे.

      नाशिक येथील भाजपच्या सोबतीला शिवसेना व राष्ट्रवादी तील मातब्बर नेत्यांनी पालकमंत्री पदाचे दावे केले असतांना न. गिरीशभाऊ महाजन यांना येथील जबाबदारी मिळाली आहे. आगामी काळातील निवडणुकांसाठी पक्षाचे त्यांना खास कामगिरी देल्याचे यातून अधोरेखित झाले. अर्थात, त्यांच्यासाठी हे आव्हान देखील असणार आहे. नाशिकच्या जोडीला जळगाव जिल्ह्यात यश मिळवण्याची कामगिरी देखील त्यांना पूर्ण करावी लागेल. म्हणजेच, आपल्या संकटमोचक या प्रतिमेला जोपासून स्थानिक स्वराज संस्थेला देखील उत्तर महाराष्ट्रात भाजपला दणदणीत यश मिळवून देतील असा आशीर्वाद भाजपच्या समर्थकांना आहे.    

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *