अत्याचार करणार्‍या नराधमास 10 वर्ष शिक्षा : भुसावळातील पोस्को विशेष न्यायालयाचा निकाल

भुसावळ (11 नोव्हेंबर 2024) : अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी नराधमास येथील न्यायालयातील बाल लैगिक अत्याचार विशेष न्यायालयाने 10 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड सुनावला. अत्याचार व पळवून नेल्याची ही घटना 28 मे 2015 रोजी घडली होती.

असे आहे प्रकरण
16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 28 मे 2015 रोजी पहाटे सहा वाजता पळवून नेण्यात आले. या प्रकरणी मुलीच्या आईने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार व पळवून नेल्याचा पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीतेला 8 ऑक्टोबर 2015 या दिवशी आणल्यानंतर संशयीत गौतम शिवचरण चव्हाण (19) याने नातेवाईक यांच्याकडे विविध ठिकाणी अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. संशयीत चव्हाण याने पीडीतेला चोपडा, तामसवाडी आणि मध्य प्रदेशात नेल्याचे तपासात समोर आले.

आरोपीला दहा वर्ष शिक्षा
याप्रकरणी येथील बाल लैंगिक अत्याचार विशेष न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. यात अतिरीक्त सरकारी अभियोक्ता विजय खडसे यांनी 9 साक्षीदारांचे जवाब नोंदविले. यात पीडीता, पीडीत मुलीची आई, तपासाधिकारी सहा.निरीक्षक आशिष शेळके, वैद्यकीय अधिकारी यांचे जबाब महत्वपूर्ण ठरले. शुक्रवारी या खटल्याचा निकाल बाल लैगिक अत्याचार विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एल.डी. गायकवाड यांनी सुनावत आरोपीला 10 वर्ष सक्षम कारावास व पाच हजार रुपये दंड सुनावला. अ‍ॅड.विजय खडसे यांना पैरवी अधिकारी उपनिरीक्षक रफिक शेख यांनी सहकार्य केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *