रामनवमीच्या प्रसंगी अयोध्येत राम भक्तांचा मोठा उत्साह : रामलल्लाचा सूर्य टिळा !! by महाराष्ट्र न्यूज वाले - नवी दिल्ली : देशभरात आज रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरु असून देशभरातील राम मंदिरांमध्ये रामभक्तांचा सागर लोटला आहे. ठिकाठिकाणी राम नवमीचे विविध कार्यक्रम होत आहे. परंतु अयोध्येत राम मंदिरात देशभरातील भाविक आले आहेत. रामलल्लाचे दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांची पारणे रामनवमीच्या दिवशी रविवारी फिटली. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचा टीळा सूर्यकिरणांनी लावण्यात आला. […]
मंत्री गिरीश महाजन यांचाखडसेवर हल्लाबोल : तोंड उघडलं तर लोक त्यांना जोड्याने मारतील ! by महाराष्ट्र न्यूज वाले - जळगाव :  राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. खडसे यांनी गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. या आरोपांना आता गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपल्यावर झालेल्या आरोपांवर एक पुरावा दाखवला तरी सक्रिय राजकारणातून बाहेर […]
ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याने वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल, by महाराष्ट्र न्यूज वाले - ओ दादा आम्ही कायम देतस, आते १०० नको ५० घ्या’ ; चालक व पोलिसाचा अहिराणी भाषेतील संवादाचा व्हिडीओ चर्चेत जळगाव:– एका ट्राफिक पोलिसांचा ट्रक चालकांकडून पैसे घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये संबंधित वाहतूक पोलिस कर्मचारी ट्रकच्या चालकाकडून पैसे घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सदर ट्रक चालक व वाहतूक पोलीस अहिराणी […]
‘घिबली’ स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंडने सर्व जनतेत धुमाकूळ घातला; याचे गंभीर परिणाम तुम्हाला माहिती आहे का? by महाराष्ट्र न्यूज वाले - आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करताय, Facial Identity चोरीला जाण्याची शक्यता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्स वापरून ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा ट्रेंड सुरु असून सर्वच वयोगटातील अनेकांना ‘घिबली’ फोटो तयार करण्याचा मोह आवरता येत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान घिबली किंवा इतर कोणतीही AI इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो त्या एआय प्रणालीसोबत शेअर […]
जळगाव : आरोग्य विभागातील लाचखोर अधिकारी एसीबीच्या ताब्यात, तर मोठ्य- मोठ्या अधिकाऱ्याची चौकशी सुरु by महाराष्ट्र न्यूज वाले - हॅलो महाराष्ट्र न्युजवाले , जळगाव : जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तक्रारदाराने लाच मागितल्याबाबत तक्रार दिली होती. आरोग्य अधिकाऱ्याने त्याचे शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. जळगाव एसीबीने लाच मागणीची सत्यता पडताळणी केली. त्यानंतर शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी दुपारी आरोग्य विभागात सापळा लावला. त्यात एका अतिरिक्त आरोग्य अधिकारी पदाच्या […]
0Shares