ट्रक चालकाकडून पैसे घेत असल्याने वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल,

ओ दादा आम्ही कायम देतस, आते १०० नको ५० घ्या’ ; चालक व पोलिसाचा अहिराणी भाषेतील संवादाचा व्हिडीओ चर्चेत

जळगाव: एका ट्राफिक पोलिसांचा ट्रक चालकांकडून पैसे घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ मध्ये संबंधित वाहतूक पोलिस कर्मचारी ट्रकच्या चालकाकडून पैसे घेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. सदर ट्रक चालक व वाहतूक पोलीस अहिराणी भाषेत संवाद करतांना दिसत असून प्राथमिक माहितीनुसार हा व्हिडीओ जळगाव जिल्ह्यातील असल्याचं समजतं मात्र  त्याची ओळख अद्याप पटलेली नसून सदर पोलीस कर्मचारी कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये ड्युटीवर असल्याबाबत माहिती मिळू शकली नाही.

महाराष्ट्र न्यूजवाले यांनी दिलेल्या वृत्तानुसार सदर व्हिडीओ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एका वाहतूक पोलिसांचा ट्रक चालकाकडून पैसे घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे म्हटले आहे.

काय आहे व्हायरल व्हिडीओ….

या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलील कर्मचारी आधी ट्रक चालकाला थांबवत आहे. नंतर ट्रकचालक वाहतूक पोलिसाला या ट्रकमध्ये केळी असल्याचे सांगत आहे. नंतर वाहतूक पोलीस त्याला १०० रूपये काढ असे म्हणत आहे. त्यानंतर चालक ‘ओ दादा आम्ही कायम देतस, आते १०० नको ५० घ्या’ असं अहिराणी भाषेत म्हणत आहे. त्यानंतर वाहतूक पोलीस ५० नाही, १०० द्या, असे म्हणत आहे. वाहतूक पोलीस चालकाकडून पैसे घेऊन पुढे जातो.

वाहतूक पोलिसांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नसून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *