आताच्या नव युगात इंटरनेटचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात करत असून याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत असून लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.
महाराष्ट्र विषेश बातमी :- सायबर गुन्हेगारीत पहिले वेगवेगळे अमीश दाखवून तर कधी शासकीय निमशासकीय कारणे सांगून ओ टी पी ची विचार पूस करून मोठ्या प्रमाणात गंडा घालत होते. तर आता सायबर गुन्हेगारी विश्वात सध्या ‘डिजिटल अटक’ या नव्या प्रकाराने धुमाकूळ घातला आहे. या नवीन प्रकारात एक निनावी व्यक्ती व्हिडीओ कॉल करते, समोरील व्यक्ती ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स, किंवा पोलिस असल्याचे सांगून थेट तुम्हाला धमकावण्यास सुरुवात करतात, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती घालून व्हिडीओ कॉलच्या आधारे तुमच्यावर पाळत ठेवून नागरिकांकडून पैसे उकळतात. या डिजिटल अटकेच्या वाढत्या घटनांमुळे सध्या पोलिसांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
21 व्या शतकात इंटरनेटचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेमुळे प्रत्येक सेवा हि घरबसल्या होऊ लागली. अगदी वस्तू खरेदीपासून ते बिल भरण्यापर्यंत घर बसल्या नागरिक ऑनलाईन व्यवहार करू लागले. यामुळे नागरिकांचा वेळ काम जरी सोपं झालं असलं. तरी हे व्यवहारात करताना सायबर चोरट्यांचा धोकाही तितकाच वाढला. ऑनलाईन फसवणुकीत सध्या डिजिटल अटक या फसवणुकीच्या नव्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गुन्ह्याची वाढलेली व्याप्ती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या ‘मन कि बात ‘ कार्यक्रमातून या गुन्ह्यांवर प्रकाश टाकत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले.

मन कि बात व्हिडीओ
‘मन कि बात’ च्या व्हिडीओत एक पोलिस अधिकारी कर्नाटक मधील एका व्यक्तीला ‘व्हिडीओ कॉल’ करून त्याच्या मोबाईल नंबर बाबत 17 तक्रारी आल्या असून भविष्यात आपल्याला त्रास होणार नाही. असे सांगत नंबर ब्लॉक करण्याचे आश्वासन देऊन, फोनवरील व्यक्तीला त्याचा जबाब नोंदवण्यास सांगून त्याची खाजगी माहिती विचारत आहे. तरुणाला विश्वास पटावायासाठी आरोपी स्वत: पोलिसाच्या वर्दीत बसला असून त्याच्या मागे तो पोलिस स्टेशन मध्ये बसला असल्याचे भासवत आहे.

डिजिटल अटक म्हणजे काय?
डिजिटल अटक घोटाळ्यामध्ये, गुन्हेगार CBI एजंट, आयकर अधिकारी किंवा कस्टम एजंट,ED, किंवा पोलिस अधिकारी म्हणून उभे राहतात आणि फोन कॉलव्दारे पिडीतांशी संपर्क करून ते फोन केलेल्या व्हॉटसअॅप किंवा स्किप सारख्या प्लॅटफॉर्म व्हिडीओ कम्युनिकेशवर स्वीच करण्यास धमकावतात. आर्थिक गैरव्यवहार, करचोरी किंवा हवाला देऊन सायबर चोरटे नंतर पीडितांना ‘डिजिटल अरेस्ट’ वॉरंटची धमकी देतात. काही घटनांमध्ये, हे फसवणूक करणारे पोलिस स्टेशन सारखे सेट अप तयार करतात जेणेकरून फोन केलेल्या व्यक्तीला त्यांच्यावर विश्वास बसावा.

गुजरात मधील विपुल पटेल नावाच्या व्यक्तीच्या सोशल मिडीया अकाऊटवरील व्हिडीओ
पुढील व्हिडीओत विपुल पटेल याला आरोपिंनी व्हॉटसअप कॉल आहे. त्यात पोलिसांच्या गणवेशात व्यक्ती स्वत:चि ओळख हि युपी पोलिस मधील अधिकारी असल्याचे सांगत आहे. तसेच विपुल यांच्याकडून आधारकार्ड आणि इतर महत्वाची माहिती जबाब नोंदवण्याच्या नावाखाली काढून घेत आहे. या पोलिस गणवेशातील व्यक्तीच्या मागे हुबेहूब पोलिस ठाण्याचा सेटअप केलेला देशात आहे. विशेष म्हणजे त्याचा मोबाईल तसेच आधार कार्ड घातपातासाठी वापरण्यात आल्याचा दावा केला गेला, तसेच बँक खात्यातून मनीलॉड्रीगचाही दावा केला असून विपुल यांना 5 लाखांचा दंड असल्याचे सांगून अटकेची कारवाई होण्याची भीती घालण्यात आल्याचे दिसत आहे. हे व्हिडीओ विपुल यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाऊट पोस्ट’ वर टाकले असून अन्य व्यक्तींनी अशा सायबर चोरट्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Leave a Reply