विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगाराला हद्दपार करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

हद्दपार आरोपींची माहिती घेत असताना दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला विशाल मुरलीधर दाभाडे (वय २३, रा. रामेश्वर कॉलनी) हा शहरात फिरत असल्याचे आढळल्याने त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपार आरोपींची माहिती घेण्याविषयी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सूचना दिल्या. पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, अतुल वंजारी, पोहेकॉ राजेश मेढे, हरिलाल पाटील, विजय पाटील, विजयसिंग पाटील, अक्रम शेख यांनी विशाल दाभाडे हा संशयीतरित्या फिरत असतांना त्याच्या रामेश्वर कॉलनीतून पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Leave a Reply