25 लाख रुपयांची दोन भामट्यांनी केली फसवणूक ; दोघांवर गुन्हा दाखल

भुसावळ – भुसावळ शहरातील टेमी व्हिला येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याने विश्वासाने दिलेल्या धनादेशचा गैरवापार करून सुमार २५ लाख ५ हजार ६०० रूपयांची फसणूक केल्याचे समोर आले आहे. गुरूवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अदिल रूसी कविना वय ५७ रा. टेमी व्हिला, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या ओळखीचे कृष्णा संजय उपाध्यय आणि सुमील नारायण तिवारी रा. विठ्ठल मंदिरवार्ड, भुसावळ यांना विश्वासाने दोन धानदेश देण्यात आलेले असतांना दोघांनी २९ ऑक्टोबर ते १७ डिसेंबर दरम्यानच्या काळात संगनमत करून १ लाख १५ हजार आणि २३ लाख ९० हजार ६०० रूपयांचे वेगवेगळे चेक परस्पर खात्यात वर्ग करून फसवणूक केली. हा प्रकार घडल्यानंतर आदिल कविना यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात कृष्णा संजय उपाध्यय आणि सुमील नारायण तिवारी रा. विठ्ठल मंदिर वार्ड, भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *